वाडा येथील बाजारपेठेतील स्वराज ज्वेलर्सवर आठ ते दहा जणांच्या टोळीने मंगळवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास पिस्तूलाच्या धाकाने सशस्त्र दरोडा टाकला.
वाडा- येथील बाजारपेठेतील स्वराज ज्वेलर्सवर आठ ते दहा जणांच्या टोळीने मंगळवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास पिस्तूलाच्या धाकाने सशस्त्र दरोडा टाकला.
मालक संपत कोलेकर यांच्या डोक्याला पिस्तूल लावून दरोडेखोरांनी नऊ लाख ९० हजार रुपयांचे सोन्याचे दागिणे आणि रोख ६० हजार रुपये घेऊन पोबारा केल्याचे वाड्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक संजय धुमाळ यांनी बुधवारी सांगितले.
दरम्यान, ठाणे ग्रामिण भागात गेल्या आठ दिवसात सशस्त्र दरोड्याच्या तीन घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.