जुहू मतदारसंघात केलेल्या विकासकामांमुळे आपला विजय निश्चित आहे, असा दावा काँग्रेसचे आमदार व उमेदवार अशोक जाधव यांनी केला.
मुंबई- जुहू मतदारसंघात केलेल्या विकासकामांमुळे आपला विजय निश्चित आहे, असा दावा काँग्रेसचे आमदार व उमेदवार अशोक जाधव यांनी केला.
देश विदेशात नावाजलेल्या जुहू चौपाटीचा पर्यटनस्थळाच्या दृष्टिकोनातून विकास होण्याकरता तसेच वॉकर्स व जॉगर्ससाठी आकर्षक बनवण्याकरता राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय, सव्र्हे क्र.१६१, वर्सोवा ते रुईया पार्क, जुहू बीचदरम्यान मॉर्निग वॉक तसेच वॉकर्सकरता ‘बीच वॉक’ बांधणे, सध्या जुहू बीच येथे वर्सोवा-जोगेश्वरी क्षेत्रातील रहिवाशांना जाण्यासाठी थेट प्रवेश नसल्यामुळे हा बीच वॉक बांधल्यास वर्सोवा, जोगेश्वरीतील रहिवाशांना जुहू बीच येथे थेट मार्ग उपलब्ध होईल. यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.
घोषित गिल्बर्ट हिल या पुरातन वास्तूचे जतन करण्याकरता या टेकडीलगत संरक्षण भिंतीच्या बांधकामासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत २ कोटी ३८ लाख रुपयांची प्रशासकीय मंजुरी मिळवल्याचे जाधव म्हणाले. ही टेकडी अमेरिकेतील डेव्हिलस टॉवरसारखी असून, गिल्बर्ट हिल टेकडी ही ब्लॅक बेसोल्ट या विशिष्ट अति कठीण दगडापासून बनली आहे. ही टेकडी जगातील एकमेव टेकडी ठरत असून, ती ज्वालामुखीपासून तयार झालेली आहे. उच्च न्यायालयाने भूवैज्ञानिक सर्वेक्षणाद्वारे टेकडीला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले आहे.
त्यामुळे पर्यटनाच्या दृष्टीने दर्जा उंचावण्याकरता कॉस्मोपॉलिटीयन एज्युकेशन सोसायटी रोड (वायरलेस कंपाउंड द क्लबजवळ) ते गिल्बर्ट हिल (पुरातन वास्तू) असा ‘रोप-वे’ बसवण्यासाठी आपण प्रस्ताव सादर केल्याचे जाधव यांनी सांगितले. तसेच र्मकडराय मेहता खेळाचे मैदान, एन. एस. रोड नं.१२अ, शामराव परुळेकर मार्ग, जुहू, येथील मैदानाच्या सौंदर्यीकरणावरही आपण भर देणार आहोत, असेही ते म्हणाले.