ओम साई मित्र मंडळाच्या वतीने यंदाही दहीकाला उत्सव सामाजिक बांधिलकी जपत साजरा करण्यात येणार आहे.
डहाणू- ओम साई मित्र मंडळाच्या वतीने यंदाही दहीकाला उत्सव सामाजिक बांधिलकी जपत साजरा करण्यात येणार आहे. २०११ मध्ये स्थापन करण्यात आलेल्या या मित्रमंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही डहाणू येथील दळवीपाडा, कोसबाड येथील आदिवासी पाडयातील बालगोपाळ तसेच आदिवासी बांधवांबरोबर दहीकाला उत्सव साजरा करण्यात येणार आहे.
ओम साई मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही सामाजिक बांधिलकी जपत यंदाही दहीकाला उत्सव साजरा करण्यात येणार आहे. यावेळी या मंडळाच्या वतीने डहाणू तालुक्यातील दळवीपाडा, कोसबाड हिल येथील आदिवासी पाडयांतील बाळगोपाळ आणि आदिवासी बांधवांबरोबर हा उत्सव साजरा करण्याचे या मंडळाने योजले आहे.
तसेच या उत्सवाच्या निमित्ताने होणा-या कार्यक्रमांतर्गत गोखले एज्युकेशनच्या आश्रम शाळेतील तसेच दळवी आदिवासी पाडयातील गरीब गरजू विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तूंचे वाटप गुरुवार, २५ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला स्थानिक आमदार पास्कल धनारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सेलार, बांगर तसेच बालमोहन विद्यामंदिर दादरचे मुख्याध्यापक यादव, उपमुख्याध्यापक मोरे, शिक्षक आणि कर्मचारी तसेच दळवीपाडयातील दळवी गुरुजी, सुभाष सावे आदी समस्त, ग्रामस्थ या वेळी उपस्थित राहणार आहेत.